तळेगाव दाभाडे हे वेगाने वाढत असलेले शहर म्हणून सर्वत्र परिचित आहे. तळेगाव दाभाडे मुख्य शहर आणि बाह्य परिसरात सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. अनेक इमारती, वास्तू नव्याने उभ्या राहत आहेत. अशातच गुन्हेगारी देखील फोफावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांनी महत्वाचे आवाहन केले आहे. ( Talegaon Dabhade Police Appeals To Builders Complain If There Is Any Trouble )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव दाभाडे, सोमाटणे, ओझर्डे, साईनगर गहजे, शिरगाव एक्सप्रेस हायवे उजवी बाजू, उर्से एक्सप्रेस हायवे उजवी बाजू हद्दीतील सर्व लहान मोठे बांधकाम व्यवसाय करणारे कॉन्ट्रक्टर आणि घर मालक यांना हे आवाहन करण्यात आले आहे. ‘जर कुणीही वाळु, खडी, क्रश आणि इतर बांधकाम साहित्य जबरदरस्तीने घेण्यासाठी दबाव आणत असेल किंवा ते साहित्य घेण्यासाठी जबरदस्ती करत असेल किंवा काम चालु ठेवण्यासाठी बेकायदेशीर पैशाची (खंडणी) मागणी करत असेल’ तर थेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी थेट पोलिस स्टेशनला येऊन किंवा पोलिसांशी संपर्क करुन तक्रार करण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे. यासाठी जारी करण्यात आलेले संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे ;
– गणेश जवादवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) – 9552234599
– नितीन लांडगे (पोलीस निरीक्षक गुन्हे) – 9823112933
– तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालय 02914 – 222444
अधिक वाचा –
– सोमाटणे येथील गीता विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्याचे जेईई परीक्षेत घवघवीत यश, शाळेकडून दुचाकी भेट
– अवैध गांजा विक्री प्रकरणी बधलवाडी येथे एकाला अटक, 28 हजारांचा मुद्देमाल जप्त