Dainik Maval News : सीआरपीएफ मध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगाव च्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला.
दरम्यान २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला अनोळखी गाडीने उडवले आणि तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध घेणे पोलिसांनी अपेक्षित होते.
दरम्यान, प्रशांत कदम हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात केली होती. मागील दोन ते तीन दिवस त्याचा कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध सुरू होतं. मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातच संबंधित व्यक्ती हा बेपत्ता झाल्याची आणि अनोळखी मृतदेह मिळाल्याची नोंद असून देखील त्याचा तात्काळ तपास करण्यात आला नाही.
संबंधित प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याचा मेसेज मित्रांनी ( पोलिसांनी नाही) शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला आणि दुःखाचा डोंगर संबंधित कुटुंबावर कोसळला. एखाद्या गंभीर घटनेमध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन तपास करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण
