तळेगाव दाभाडे येथील सुनिलकुमार उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या पक्षीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकूशराव पाटील होनाळीकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. तसेच त्यांच्या हस्ते सुनिल उकाळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षाच्या प्रमुख कार्यकारणीची सभा शासकीय विश्रामगृह, पुणे इथे नुकतीच पार पडली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर प्रमुख उपस्थित होते. तसेच, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रेमानंद वाघमारे, प्रदेश समन्वयक सिंदेश्वर वाकळे, प्रदेश उपाध्यक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष परमेश्वर देशमुख, पुणे जिल्हा अध्यक्ष रबबंद्र वेदपाठक, संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष भरत कदम, पुणे जिल्हा संघटक अनिलराव मोळवणे, महाराष्ट्रीयन मराठा महासंघ प्रदेश सरचिटणीस सुनील रसाळे, विजया लक्ष्मी सिंदगी हेही यावेळी उपस्थित होते. ( Talegaon Dabhade Sunil Ukale appointed as National Maratha Party Maval Lok Sabha Constituency President )
सुनिल उकाळे यांना अंकुशराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी, राष्ट्रीय मराठा पार्टी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा ,गोवा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश. जमू काश्मीर, दिल्ली, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब अशा 18 राज्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज होत असल्याचे सांगितले.
अधिक वाचा –
– इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि चर्चासत्र
– वडगावजवळ गॅरेजमध्ये सुरु होता जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत 7 जण गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम