पनवेल महापालिकेत नोकरीला लावतो, असे आश्वासन देऊन तरूणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मावळमधील तळेगाव दाभाडे येथील तरुणाची फसवणूक झाली आहे. दिनांक 3 डिसेंबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे इथे ही घटना घडली. ( Talegaon Dabhade Young Man Was Cheated Of Five Lakh Fifty Thousand Rupees By Pretending Job )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नागेश तानाजी जगताप (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) याने या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) रोजी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप मारुती पांडव (वय 30, रा. नवी मुंबई), जगन्नाथ बालकृष्ण (वय 37, रा. जुईनगर, ठाणे), नितीन महादू वाघ (वय 38, उल्वे, नवी मुंबई) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी ( Talegaon Dabhade Police Station ) दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसांत संगनमत करून फिर्यादीला पनवेल महापालिकेत भरारी पथकामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्यासोबतच नोकरी लावण्याकरिता डिपॉझिट म्हणून फिर्यादीकडून 5 लाख रुपये तसेच फी म्हणून 50 हजार रुपये असे साडेपाच लाख रुपये घेतले. आरोपींनी फिर्यादीच्या नावे पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून दिले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न देता फसवणूक केली. फिर्यादीने पैशांची मागणी केली असता दीड लाख रुपये परत करत 4 लाख रुपयांची मात्र फसवणूक केली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
– खळबळजनक : वडगाव मावळ रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह