तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगर पायथ्याशी शुक्रवार सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. एका भरधाव टँकरची धडक बसल्याने हा 33 वर्षी तरुण जागीच ठार झाला. ( Talegaon MIDC Police Biker Killed On The Spot In Collision With Tanker At The Foot Of Bhandara Dongar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संतोष दादाराव सुरवाडे (वय 33, रा. विद्याविहार कॉलनी, तळेगाव-दाभाडे, मूळ गाव साळशिंगी ता. बोदवड, जि. जळगाव) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवार (दिनांक 10 फेब्रुवारी) रोजी सकाळी नऊच्या सुमारास भंडारा डोंगर पायथ्याजवळील काळभोर पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. सदर टँकर हा तळेगावकडून चाकणच्या दिशेने भरधाव वेगात चालला होता.
त्यावेळी सदर दुचाकीस्वाराला त्याची पाठीमागून जोरात धडक बसली. टँकर चालक रामनारायण रतन यादव (रा. साईश्रध्दानगर, पिसवली, कल्याण, जि.ठाणे. मूळ गाव सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पी.पी. अहिरे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
– उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भोईरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन