Dainik Maval News : पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता चौथी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव येथे पार पडली. मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2024-25 मध्ये येणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी सदर कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिक्षकांनी प्रज्ञाशोध परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे आव्हान स्विकारले तरच गुणवत्ता वाढ होण्यास मदत होईल. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी चौकस होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे मिलिंद शेलार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सचिन कोळवणकर, संदीप मगर, दिलीप टकले, रावसाहेब शिरसाट, रेणू शर्मा, निर्मला काळे, सविता क्षीरसागर, सुनंदा दहितुले केंद्रप्रमुख यावेळी उपस्थित होते. मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाचे अचूक व प्रभावी अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे घटकनिहाय सखोल मार्गदर्शन आणि स्वतःचे अनुभव देऊन मंगल आहेर, उमेश माळी, सरोजा अंबुलगे, कृपा पवार, ऋतुजा जागीरदार यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले.
मावळ तालुक्यातील 213 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 215 प्रशिक्षणार्थी शिक्षक या कार्यशाळेला उपस्थित होते. विषय साधन व्यक्ती ज्योती लावरे यांनी कार्यशाळेचे उत्तम नियोजन, सूत्रसंचालन करत सर्वांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– आता प्रत्येक शाळा, कॉलेजसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्ती ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची सुचना
– साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आता संपूर्ण संचालक मंडळावर
– आनंदाची बातमी ! राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मिळणार अखंडित वीज, मंत्रिमंडळाचा निर्णय – वाचा अधिक