व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आता प्रत्येक शाळा, कॉलेजसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्‍ती ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची सुचना

शाळा व महाविद्यालयांमध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. याकरिता सात दिवसात प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करा.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 28, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
IPS Sathyasai Karthik

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा उपविभागातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज मधील मुख्याधिकारी, प्राचार्य, मॅनेजमेंट, महिला शिक्षिका, पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्या सुरक्षेबाबत काही महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

शाळा व महाविद्यालयांमध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. याकरिता सात दिवसात प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करा, अशा सूचना लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सर्व शाळांचे प्रमुख यांना दिल्या आहेत. ( Appointment of police officers for each school and college instructions of IPS Sathyasai Karthik  )

या बैठकीला आयपीएस सत्यसाई कार्तिक यांसह लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, रेल्वे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार, वन विभागाचे अधिकारी सागर चुटके, लोणावळा शहर चे सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड उपस्थित होते.

शाळा महाविद्यालयांना देण्यात आलेल्या सुचना पुढीलप्रमाणे,
1) शाळा, कॉलेज परीसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, त्याचे मॉनिटरिंग करणे,
2) शाळा, कॉलेजमध्ये तक्रार पेटी सुरक्षित ठिकाणी बसवुन ती नियमित उघडुन त्यातील तक्रारींचे निवारण करणे,
3) शाळा, कॉलेज परीसरातील ग्रे एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,
4) विद्यार्थी सुरक्षा समिती व समुपदेशन कक्षाची स्थापना करणे
5) प्रवेशव्दार, बाहेर पडण्याचे गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे, पीए सिस्टीम बसवुन त्याव्दारे सुचना देणे,

6) पोलीस दादा, पोलीस दिदी, निर्भया पथक, पोलीस पेट्रोलींग याव्दारे शाळा, कॉलेज येथे भेटी देऊन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे सुरक्षेचा नियमित आढावा घेणे,
7) महिला दक्षता समिती स्थापन करून त्यांचे मार्फतीने विद्यार्थीनीचे समस्या जाणुन घेवुन कार्यवाही करणे,
8) शाळा, कॉलेज मधील सर्व स्टाफ, वॉर्डन, सफाईकामगार, बस ड्रायव्हर, सुरक्षारक्षक यांचे चारीत्र पडताळणी करून घेणे,
9) शाळा कॉलेज परीसरातील पानटपरी, दुकाने यांची चेकींग करणे,
10) शाळा कॉलेज परीसरात पोलीस पेट्रोलींग करणे,

11) शाळा, कॉलेज प्रवेशव्दार व बाहेर पडण्याचे ठिकाणी बाहेरील इसमांची व संशयित व्यक्तीची चेकींग करणे,
12) शाळा, कॉलेज मध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्याव्दारे सीसीटीव्हीव्दारे संपुर्ण परीसरावर नियंत्रण ठेवणे,
13) शाळा, कॉलेज परीसरात वाढत चाललेले अमली पदार्थाचे सेवनाबाबत संकल्प नशामुक्ती अभियानाव्दारे विद्यार्थीमध्ये जागृती करून त्यांचे समुपदेशन करणे

वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थित त्यांना संकल्प नशा मुक्ती अभियान व सुरक्षितते संदर्भातील सूचना दिल्या. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व रेल्वेचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध शाळांच्या प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये भेडसावत असलेल्या समस्या उपस्थित अधिकारी वर्गसमोर मांडल्या तसेच शाळा भरताना व सुटताना पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली.

अधिक वाचा –
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News
– संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त – आयपीएस सत्यसाई कार्तिक
– बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामशेत पोलिसांना निवेदन, ‘या’ प्रमुख मागण्यांचा समावेश । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आता संपूर्ण संचालक मंडळावर

Next Post

रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmer dies in buffalo attack

रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.