जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील अनेक गावात घरोघरी नळ पाणीपुरवठा योजनांमधून पाणी पोहोचले. आताही अनेक गावात जल जीवन मिशन योजनेतून काम सुरु आहे. यापैकी दिवड, ओव्हळे गावातील पाणीपुरवठा योजनांचे काम युद्ध पातळीवर सुरु असून अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच या गावांतील घराघरात जलगंगा येणार असून महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार आहे. ( Tap Water Supply Schemes Under Jal Jeevan Mission Scheme In Ovale Diwad Village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा – चांदखेड आणि परंदवडी ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा, महिलांची पायपीट थांबणार
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या दिवड, ओव्हळे, आढले बुद्रुक, डोणे पाणी योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन आता हे काम पूर्णत्वाकडे जात आहे. येत्या 15 ते 20 दिवसात प्रत्यक्ष गावात पवनेचे पाणी येईल. आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आणि सहकार्यातून हे कार्य होत असल्याचे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले.
(माहिती स्त्रोत – fb/rakesh.dilip.sathe)
अधिक वाचा –
– कुसवली गावातून ग्रामदूत प्रकल्पाचा शुभारंभ, 60 गावात राबवला जाणार प्रकल्प
– ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन