मंगळवारी (दिनांक 20 डिसेंबर) रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान पुणे मुंबई जुन्या महामार्गावर शिंग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेच्या खिंडीत उतारावर अपघात झाला. यात टेम्पो (छोटा हत्ती ) नंबर MH-05-EL-3891 वरील चालक रणजित गुप्ता (रा. डोंबिवली) याचे वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो रोडच्या बाजूला उलटला. ( Tempo Accident Near Shingroba Temple On Mumbai Pune Old Highway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अपघात स्थळी आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आरटीओचे अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीसाठी प्रयत्न करत होते. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल केली असून त्यातील एक महिला व पुरुष यांना रुग्णालय कामोठे येथे शिफ्ट केले आहे.
अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आणि बाधित वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
अधिक वाचा –
– मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला
– मावळमधील ‘या’ गावात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास
– यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी