मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर 37.00 जवळ भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका इर्टिगा कारचा ढेकू नजीक भीषण अपघात झाला असून यात कारमध्ये असलेल्या चालकासह 9 प्रवाशांपैकी 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य 3 जण गंभीर जखमी आहेत. ( Terrible Accident Of Ertiga Car On Mumbai Pune Expressway 5 Dead )
प्राप्त माहितीनुसार, इर्टिगा कारमध्ये चालक अधिक आठ असे एकूण 9 जण प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी सदर कारमधून प्रवास करत होते. ही कार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावाच्या हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 1 महिला किरकोळ जखमी झाली आणि अन्य 4 जणांना गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे नेण्यात आले. मात्र, त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सध्या चालक आणि इतर 2 जणांवर उपचार सुरू आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अपघातातील मृत :
1) अब्दुल रहमान खान, 32 वर्षे, घाटकोपर
2) अनिल सुनिल सानप
3) वसीम साजिद काझी, रा. राजापूर, जि. रत्नागिरी
4) राहुल कुमार पांडे, वय – 30 वर्षे, फ्लॅट न.-605, रिद्धेश्वर हौ. सो., कामोठे. नवी मुंबई
5) आशुतोष नवनाथ गांडेकर, 23 वर्षे,
5, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई
अपघातातील गंभीर जखमी :
1) मच्छिंद्र आंबोरे – वय 38 वर्ष (चालक)
2) अमीरउल्ला चौधरी
3) दिपक खैराल
अपघातात किरकोळ जखमी :
1) अस्फीया रईस चौधरी, 25 वर्षे, रा. कुर्ला, मुंबई
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास (रात्री 11 वाजून 40 मिनिटे) हा अपघात झाला. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून अपघात स्थळे खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले इत्यादीने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. ( Terrible Accident Of Ertiga Car On Mumbai Pune Expressway 5 Dead )
अधिक वाचा –
– देव तारी त्याला कोण मारी! एका ड्रायव्हरच्या समयसुचकतेमुळे वाचला दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना
– मतदार यादीत नाव नसलेले शेतकरीही लढवू शकतात बाजार समितीची निवडणूक; वाचा मंत्रिमंडळाने घेतलेले 15 निर्णय एका क्लिकवर