मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पोचा ड्रायव्हर किलोमीटर 42.400 या ठिकाणी आला असता त्याचे डीझेल संपले. गाडी बंद पडल्या कारणे फोन वरती संपर्क करत असताना त्याच्या फोनची बॅटरी संपली. त्या दरम्यान विरुद्ध दिशेला पुण्याकडे जाणारा एक ट्रक उभा होता त्या ट्रकमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी हा ड्रायव्हर रस्ता क्रॉस करत होता. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर त्याच्या लक्षात आले नाही आणि अचानक त्या चेंबरमध्ये तो कोसळला. ( Driver Life Saved On Mumbai Pune ExpressWay )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चेंबर साधारणता 40 फुट खोल होते. अचानक पडल्यामुळे त्याने घाबरून ओरडण्यास सुरुवात केली असता पलीकडे बंद असलेल्या गाडीतील ड्रायव्हरने त्या आवाजाचा अंदाज घेतला तेंव्हा चेंबरमधे तो पडल्याचे लक्षात आले. त्या ड्रायव्हरने समय सूचकतेने पोलीस हेल्पलाइनवर फोन केला. पोलीस हेल्पलाइन वरून माहिती मिळाल्यावर बोरघाट वाहतूक पोलीस, देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटल, मृत्युंजय देवदूत, खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे टीम मेंबर स्पॉटवर दाखल झाले.
देवदूतच्या टीमने खाली जाऊन अंदाज घेतला असता चालक गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला स्ट्रेचरला रोपने बांधले आणि नंतर सर्वांनी त्या खोल चेंबर मधून चालकाला वर काढले. एवढ्या वरून पडल्यामुळे ड्रायव्हरचे हात पाय आणि कंबर मेजर फ्रॅक्चर झाल्याची शक्यता असल्याने त्याला पुढील उपचार करता जे जे हॉस्पिटल मुंबई येथे हलवण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे या अपघातातील पुढील कारवाई करत आहेत.
दैव बलवत्तर म्हणून अशा दुर्धर अपघातात देखील चालक वाचल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अपघात टीमचे विजय भोसले, गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, निलेश कुदळे, निखिल ढोले, शैलेश मांडवकर यांनी आणि महामार्गावरील सर्वच यंत्रणांनी तातडीने हालचाल करुन ऑपरेशन सक्सेस केल्या बद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी कौतुक केले आहे.
अधिक वाचा –
– Video : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अनेक प्रवासी जखमी
– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
– पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गावांतील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवदेन