स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीरांना विविध प्रकारचे शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी देशातील पहिली युद्ध कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यासाठीची तालीम सुरु करुन क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी एक इतिहास केला, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण आणि कार्यक्रम समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ( Krantiguru Krantiveer Lahuji Raghoji Salve Birth Anniversary )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महविकास आघाडीचे सरकार असताना मी अर्थमंत्री होतो, तेव्हा लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूसंपादन केले, आता स्मारकाचे काम पूर्ण होत आहे. समाजाने आपल्या काही सूचना असतील त्या कराव्यात, असे आव्हानही अजित पवार यांनी केले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबदस दानवे म्हणाले की, लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यावेळी ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी’ अशी घोषणा केली होती. त्यांनी अनेक क्रांतिकारक घडवले होते. त्यांचा तो संपूर्ण इतिहास समाजापर्यंत पोहचणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे ( lahuji vastad salve ) स्मारक संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक अविनाश बागवे, भिमा कोरेगाव विजय स्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, साधू तात्या थोरात, रत्नप्रभा जगताप, अश्विनी कदम यांसह विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, माजी मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, शांतीलाल मिसाळ यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पं. नेहरुंमुळेच टिकला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा ! – श्रीरंजन आवटे
– 75 बाईकर्स, 75 दिवस आणि 34 राज्ये, काय आहे फ्रिडम रायडर बाईक रॅली? जाणून घ्या सविस्तर