Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा जवळील खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकला, यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी ( दि. १७ ) हा भीषण अपघात घडला आहे. धनंजय दत्तात्रेय घुंडरे ( वय 36, राहणार देवाची आळंदी, पुणे ) असे मृत चालकाचे नाव आहे.
सिमेंटचे ब्लॉक्स घेऊन येणारा हा ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. अमृतांजन पुलाजवळ तीव्र वळणावर चालकांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि टक्र अमृतांजन पूला जवळ असलेल्या पुलाच्या खांबाला धडकला. ही धडक इतकी जोरात होती, की ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अपघातामुळे महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक आणि हेल्प फाउंडेशनचे मेंबर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्याला सुरुवात केली. अपघातग्रस्त ट्रकमधील मृत चालकाला बाहेर काढले. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

