Dainik Maval News : दहशतवाद्यांच्या नांग्या केंद्र सरकारने ठेचून काढाव्यात असे प्रतिपादन रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या निषेध मोर्चा व श्रद्धांजली सभे प्रसंगी प्रशांत दिवेकर यांनी केले.
केंद्र सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला ठेचून काढावे. कश्मीर मधील पर्यटक वाढल्यामुळे दहशतवाद्यांना आता त्या ठिकाणी स्वतःला धोका निर्माण झाला असल्यामुळे अशा निष्पाप नागरिकांचा बळी घेण्याचे कृत्य त्यांनी केले. या कृत्याचा त्यांना करारा जवाब नक्कीच मिळेल अशी आशा प्रशांत दिवेकर यांनी व्यक्त केली.
तळेगाव शहरातील नागरिकांनी बाहेरून व्यवसायासाठी येणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या यांना ओळखून त्यांनी आम्हाला कळवावे आम्ही त्यांचा बंदोबस्त करू व पोलिसांना कळवू असे प्रतिपादन तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अरुण माने,श्रीराम कुबेर रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल, सर्व प्रांत पल दीपक फल्ले यांनी आपले मनोगता मध्ये आल्याचा निषेध करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
तळेगाव दाभाडे शहरातील जिजामाता चौक या ठिकाणी मूक मोर्चाला सुरुवात झाली शाळा चौक,गणपती चौक,खडक मोहल्ला,बाजारपेठ मार्गे मारुती मंदिर चौक या ठिकाणी निषेध व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या मोर्चाचा समारोप झाला. तळेगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले मोर्चाचे नियोजन संतोष परदेशी,बसप्पा भंडारी,प्रशांत ताये,विनोद राठोड यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News