जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात गुरुवारी (21 डिसेंबर) दहशतवाद्यांनी लष्करी वाहनावर केलेल्या भ्याड हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहेत. तर, इतर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. काल संध्याकाळपासून या ठिकाणी लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काल गुरुवारी (दि. 21 डिसेंबर) दुपारी पावणे चारच्या सुमारास राजौरी-ठाणामंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. हल्ला झालेल्या वाहनांमध्ये ट्रक आणि जिप्सीचा समावेश आहे. या हल्यात चार जवान शहीद झालेत, तर अन्य तीन जवान जखमी झाले. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला, असे वृत्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं दिले आहे. ( Terrorist Attack On Indian Military Vehicles In Jammu And Kashmir Rajouri Area 4 Soldiers Died )
Visuals from Jammu and Kashmir’s Poonch after terrorists ambushed two Army vehicles earlier today.
(Note: Viewer discretion is advised.)
(Note: Visuals deferred by unspecified time.) pic.twitter.com/k2ZnXHpP3t— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2023
दोन वर्षात 35 जवान शहीद –
दरम्यान, गेल्या महिन्यात राजौरीतील कालाकोट इथं लष्कर आणि विशेष सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर दोन कॅप्टनसह सैनिक शहीद झाले होते. गेल्या दोन वर्षांत या प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा –
– नवं संकट! कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन
– स्तुत्य उपक्रम! कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही आणि 200 पुस्तके भेट
– राष्ट्रवादीकडून गावनिहाय संवाद दौऱ्याची उत्साहात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात गावोगावी चर्चा आणि बैठका