महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला तिच्या घरात असलेल्या वृद्ध महिलेला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण करणारी महिला ही सून आणी अन्यायग्रस्त वृद्ध महिला ही त्या महिलेची सासू असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने हे सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर शेअर केलेत. ( Thane Viral Video Daughter In Law Abuses Brutally Assaults Mother In Law Over Family Dispute )
प्राप्त माहितीनुसार, ठाणेच्या कोपरीतील सिद्धार्थनगर परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत संबंधित महिला ही वृद्ध महिलेला शिवीगाळ करताना दिसतेय. तसेच ती तिच्या सासूला घर सोडायला सांगते तेव्हा प्रत्युत्तरदाखल वृद्ध महिलाही सूनेला शिवीगाळ करताना दिसत आहे. मात्र त्यानंतर व्हिडिओत महिला ही वृद्ध महिलेच्या दिशेने धावते आणि तिला जमीनीवर खेचते, तसेच वृद्ध महिलेला जमिनीवर ढकलते असंही व्हिडिओत दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना स्वयंपाकघरात एक महिला उभी असून ती हे सर्व फक्त पाहतेय आणि कोणताही हस्तक्षेप करत नाही, असंही दिसत आहे.
#Daughter-in-law Mercilessly Beats Elderly #Mother-in-law,
Komal Lalit Dayaramani (53-year-old) working at United India Insurance Co. Ltd, Kapurbawdi verbally abused,Bites and Beats up Mother-in-law at her residence in Siddharth Nagar,Kopri,Thane East.
Exclusive CCTV footage of… pic.twitter.com/ztKXo19QyS— Binu Varghese✍???? (@SabSeTezz1) October 7, 2023
#Thane | #Video is going #viral of Daughter-in-law hitting 53 Yr old Mother-in-law in #kopri in #Maharashtra#CrimeNews #CrimesAgainstHumanity#homecrime#viralvideo #WomenSafety@CMOMaharashtra @ThaneCityPolice @DGPMaharashtra @DeepikaBhardwaj pic.twitter.com/oNeeMl4aLp
— Mumbai Tez News (@mumbaitez) October 8, 2023
#Thane: Daughter-In-Law Abuses, Brutally Assaults Mother-In-Law Over Family Dispute.
Attack captured on CCTV camera shows disturbing visuals of helpless elderly woman. Thane police responds after footage of incident that took place in Siddharth Nagar area of Thane’s Kopri goes… pic.twitter.com/FneRhCHpiM
— Free Press Journal (@fpjindia) October 8, 2023
Thane Woman Caught On CCTV Camera Thrashing & Dragging Old Mother-in-Law
Accused has been identified as Komal Lalit Dayaramani (53), working at United India Insurance Co. Ltd, Kapurbawdi pic.twitter.com/edZCyNwXyX
— ミ????????★ ???????????????????????????????????????????? ★????????彡 (@KyaaBaatHai) October 8, 2023
व्हायरल सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडली. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल होऊन घटना समोर आली आहे. ठाणे पोलिसांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून ठाणे शहर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला उत्तर देत याप्रकरणी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा
– जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा
– मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार