मावळ तालुक्यातील तळेगाव (आंबी) एमआयडीसी येथील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगार विरोधी धोरण आणि कामगारांचा विचार न करता परस्पर कंपनी हस्तांतरण निर्णयाच्या विरोधात कामगार संघटनेने मागील आठवड्यापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आणि कामगारांना नवीन कंपनीमध्ये सामावून घेण्यासाठी वडगाव शहर भाजपा पदाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. ( Vadgaon Maval City BJP Supports Indefinite Chain Hunger Strike Of General Motors Company Workers Who Suffered Injustice )
यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, भाजपा संघटन मंत्री किरण भिलारे, माजी नगरसेवक ऍड विजयराव जाधव, रविंद्र म्हाळसकर, पवना कृषकचे अध्यक्ष विठ्ठल घारे, मावळ विचार मंचचे अध्यक्ष श्रीराम ढोरे, संतोष पिंपळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जनरल मोटर्स कंपनी प्रकरण नक्की काय आहे?
जनरल मोटर्स ही तळेगाव एमआयडीसीतील मोठी कंपनी असून हजारो कामगारांचे कुटुंब या कंपनीवर अवलंबून होते. परंतू कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील कामगार देशोधडीला लागले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटनेकडून न्यायालयासह विविध पातळीवर संघर्ष सुरु आहे. जे कामगार ऐन तारुण्यात वयाच्या पंचविशीत कंपनीत रुजू झाले. सुमारे 13 वर्ष कायमस्वरुपी म्हणून काम केल्यानंतर अचानक त्यांच्या हक्काचा रोजगार त्यांच्याकडून हिरावला जातोय. तर दुसरीकडे आज सद्यस्थितीत वयाच्या चाळीशीत असणाऱ्या कामगारांना कुठे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाहीये. कंत्राटी नोकरीवर त्यांचे कुटुंब चालवता येत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. अखेर जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार अन्यायग्रस्त कामगारांनी त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर ‘बेमुदत साखळी उपोषणाला’ सुरुवात केली आहे. उपोषण सुरु होऊन सात दिवस उलटले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– खाकीला डाग! 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा, महिलेची तक्रार
– वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील 15 गावांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती
– ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय? त्या निवडणूका कधी जाहीर होणार? नक्की वाचा