मावळ तालुक्यातील तळेगांव एमआयडीसी येथील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगार विरोधी धोरण आणि कामगारांचा विचार न करता परस्पर कंपनी हस्तांतरणाचा निर्णय ह्या विरोधात कामगार संघटनेने मागील आठवड्यापासून साखळी उपोषण एमआयडीसी रोड सर्कल इथे सुरू केले आहे. त्या आंदोलनाला वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, महिला अध्यक्षा पद्मावती ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, विलास दंडेल, चंद्रजीत वाघमारे, विशाल वाहिले, पोटोबा देवस्थान विश्वस्त सुनीता कुडे, शरद ढोरे, गणेश ढोरे, आफताफ सय्यद, विकी ढोरे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जनरल मोटर्स कंपनी प्रकरण नक्की काय आहे?
जनरल मोटर्स ही तळेगाव एमआयडीसीतील मोठी कंपनी असून हजारो कामगारांचे कुटुंब या कंपनीवर अवलंबून होते. परंतू कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील कामगार देशोधडीला लागले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटनेकडून न्यायालयासह विविध पातळीवर संघर्ष सुरु आहे. जे कामगार ऐन तारुण्यात वयाच्या पंचविशीत कंपनीत रुजू झाले. सुमारे 13 वर्ष कायमस्वरुपी म्हणून काम केल्यानंतर अचानक त्यांच्या हक्काचा रोजगार त्यांच्याकडून हिरावला जातोय. तर दुसरीकडे आज सद्यस्थितीत वयाच्या चाळीशीत असणाऱ्या कामगारांना कुठे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाहीये. कंत्राटी नोकरीवर त्यांचे कुटुंब चालवता येत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. अखेर जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार अन्यायग्रस्त कामगारांनी त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर ‘बेमुदत साखळी उपोषणाला’ सुरुवात केली आहे. उपोषण सुरु होऊन सात दिवस उलटले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील 15 गावांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती
– ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय? त्या निवडणूका कधी जाहीर होणार? नक्की वाचा
– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन