Dainik Maval News : बॉलीवूड अभिनेत्री संगिता बिजलानीच्या पवनाधरण परिसरातील बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिकोणा पेठ भागातील या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संगिता बिजलानीकडे खाजगी कामगार आहेत. चार महिन्यांनंतर, १८ जुलै रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास संगिता बिजलानी आपल्या बंगल्यावर आल्या असता, चोरीची घटना उघडकीस आली. ७ मार्च २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत या बंगल्यात कोणी राहत नव्हते.
चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूने कंपाऊंड फोडून, पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि टीव्ही तसेच रोख रक्कम चोरून नेली. अशीही माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. बोकड व विजय गाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी