तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध हॉटेल थंडा मामला येथे चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी दिनांक 16 जून रात्री साडेबारा ते पहाटे 5 दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी थंडा मामला हॉटेलच्या लॉजिंग रूममधील कॅश काऊंटरमधील 10,500 रूपये रोख आणि 50 हजार रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन चोरट्याने लंपास केले आहेत. पोलिस उपनिरिक्षक वारे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. ( Theft at Hotel Thanda Mamala in Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– संस्थेच्या शाळांमधील फी कमी करण्यासंदर्भात बाळा भेगडे यांना पालकांचे निवेदन । Maval News
– सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन
– मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांच्यासमोर आहेत ‘ही’ आव्हाने । Maval MP Shrirang Barne