व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने हल्ला ! मावळमधील धक्कादायक प्रकार, वडगाव पोलिसांकडून आरोपीला अटक

मोबाईल नंबर दिला नाही म्हणून एका 25 वर्षीय महिलेवर चाकू हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2024
in लोकल, ग्रामीण
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


मोबाईल नंबर दिला नाही म्हणून एका 25 वर्षीय महिलेवर चाकू हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. कान्हे परिसरातील एका कंपनीजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात वडगाव मावळ पोलिसांत भा.द.वी. कलम 307, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी संतोष मारूती लगली (वय 43 वर्षे, रा. मावळ तालुका) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज, सोमवारी (दि. 17 जून) सकाळी 8 वाजता ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोघेही कान्हे परिसरातील एका कंपनीत एकाच विभागात कामाला आहेत. मागील अनेक दिवसांपासून आरोपी हा फिर्यादीकडे तिच्या मोबाईल नंबरची मागणी करत होता. परंतू फिर्यादीने वारंवार त्याला नकार दिला. त्याचाच राग मनात धरून आरोपीने आज (दि. १७) सकाळी फिर्यादी महिला कामावर जात असताना तिच्यावर चाकूने खुनी हल्ला केला. यात तिच्या पोटावर वार झाल्याने ती जखमी झाली. नंतर आरोपी तिथून पळून गेला. महिला त्याच अवस्थेत कंपनीत पोहोचल्यावर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास महिलेने स्वतः याबाबत पोलिसांत फिर्याद दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून उद्या (दि. १८ जून) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी दिली. पोसई सांगळे हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( woman was attacked with knife for not giving her mobile number accused arrested by Vadgaon Maval police )

अधिक वाचा –
– सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन
– मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांच्यासमोर आहेत ‘ही’ आव्हाने । Maval MP Shrirang Barne
– लोणावळ्यात पर्यटकांचा ‘पूर’, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ‘उच्चांक’, वाहनांची संख्या वाढल्याने ‘वाहतूककोंडी’ । Lonavala News


Previous Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime

Next Post

तळेगाव दाभाडेमधील हॉटेल थंडा मामला येथे चोरी । Talegaon Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Theft-News

तळेगाव दाभाडेमधील हॉटेल थंडा मामला येथे चोरी । Talegaon Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.