व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime

सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरोधात दणकेबाज कारवाई. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जण जेरबंद.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
lonavala ips satya sai karthik team

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यासाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. दिनांक 09/06/2024 रोजी कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पो.स्टे हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर, रमेश शिंदे यांचे चाळीत इसम नामे 1)दिनेश दीपक शिंदे, वय 24 वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे व 2) सौरभ राजेश शिनगारे, वय 24 वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण 32 ग्रॅम एमडी पावडर हा अमलीपदार्थ व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 3,20,146/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो कॉ अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद कण्यात आला आहे तसेच पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

तसेच दिनांक 16/06/2024 रोजी श्री कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 06.20 वाजताचे सुमारास इसम नामे 1)शिवाजी मारुती कडू, वय 35 वर्ष, राहणार कुरवंडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे व 2) दिलीप बबन पिंगळे, वय 29 वर्षे, राहणार कुनेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझ्झा गाडीतून लोणावळा दिशेकडे जात असताना लोणावळा पो.स्टे हद्दीतील रायगड ते कुरवडे रोडवर, ड्रीमलँड बंगल्यासमोर श्री सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह त्यांना थांबवून, पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे सुमारे 44000/- रू किमतीचे एकूण 04.40 ग्रॅम एम.डी पावडर मिळून आले आहे. सदरचे एम.डी पावडर हे चारचाकी गाडीतून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने त्यांचेकडून चार चाकी वाहनासह एकूण 8,94,000/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पो स्टे येथे एन.डी.पी.एस ॲक्ट, 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा पो.स्टे चे सपोनि लाड हे करत आहेत.

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे 3,60,000/- रू. किमतीच्या एकूण 36.60 ग्रॅम एम.डी पावडरसह रू.12,14,146/- (अक्षरी – बारा लाख चौदा हजार एकशे सेहचाळीस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे. ( lonavala ips satya sai karthik team arrested four people who selling narcotics goods worth 12.50 lakhs seized )

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अमोल ननवरे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश ठाकूर, पो.कॉ प्रतीक काळे , पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ सौरभ साबळे, पो.कॉ यश माळवे यांचे पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन
– लोणावळ्यात पर्यटकांचा ‘पूर’, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ‘उच्चांक’, वाहनांची संख्या वाढल्याने ‘वाहतूककोंडी’ । Lonavala News
– आंबी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

संस्थेच्या शाळांमधील फी कमी करण्यासंदर्भात बाळा भेगडे यांना पालकांचे निवेदन । Maval News

Next Post

मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने हल्ला ! मावळमधील धक्कादायक प्रकार, वडगाव पोलिसांकडून आरोपीला अटक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने हल्ला ! मावळमधील धक्कादायक प्रकार, वडगाव पोलिसांकडून आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.