लोणावळा शहरातील रामनगर भागात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रामनगर येथे 1 तारखेच्या मध्यरात्रीपासून ते 2 तारखेच्या सकाळपर्यंत तीन घरात चोरी झाली. ज्यात चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. लोणावळा शहर पोलिसांत याप्रकरणी शनिवारी (दि. 2) फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 380 आणि कलम 457 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
एका महिला फिर्यादीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला फिर्यादी ह्या पतीसोबत मागील एक महिना पासून परगावी असताना त्यांच्या रामनगर येथील घरात 1 मार्च रात्री 10 वाजलेपासून ते 2 मार्च सकाळी 7 वाजताच्या दरम्यान चोरी झाली. ही घटना दुसऱ्या दिवशी अर्थात 2 तारखेला त्यांच्या शेजाऱ्यांनी फिर्यादींना सांगितली. त्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेतली असता घराचा दरवाजा उघडा आणि घरातील सामान अस्ताव्यस्त स्वरुपात पडलेले दिसले. घरातील पैसे आणि दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले. ज्यात एकूण 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. ( Theft in Ramnagar area of Lonavala City Three houses were burglarized on same day )
तसेच, ह्या महिला फिर्यादीच्या घरापासून जवळील एका घरात याच कालावधीत चोरी झाली, ज्यात सोने चांदीचे दागिने असा एकूण 41 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. त्यासह फिर्यादी महिलेच्या घराच्या पाठीमागील घरातही घरातील सदस्यय जत्रेनिमित्त परगावी गेलेले असताना चोरी झाली. अशी एकाच दिवशी समान कालावधीत रामनगर मध्ये तीन घरात चोरी झाली असून एकूण 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा शहर पोलिसचे सब इन्स्पेक्टर पाटील ह्या याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
– मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ
– पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News