पार्क केलेल्या कारची काच कट करून कारमध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि रोख रक्कम चोरी केल्याची घटना तळेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम 379, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 22 मे रोजी रात्री साडेसात ते पाऊणेआठ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी फिर्यादी राजेश प्रभाकर थोरात (वय 38, रा. आंबी रोड,वराळे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. 24 मे) फिर्याद दिली आहे. ( Theft of laptops and mobiles from cars Talegaon Dabhade Police )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांची गाडी (क्रमांक एमएच 14 जीएन 5330) ही पार्क केली होती आणि ते चहा पिण्यासाठी गेले होते. तेव्हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीची पाठीमागील काच कट करुन गाडीतील दोन लॅपटॉप किंमत 30,000 रुपये आणि दोन मोबाईल किंमत 20,000 रुपये आणि 4500 रुपये रोख रक्कम चोरी केली, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव पोलिस पोउपनि कोकाटे हे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– तळेगाव नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यासाठी पथके तयार ! होर्डींग काढताना अडवणूक केल्यास कारवाई होणार
– महत्वाची बातमी ! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे 27 मे पासून अर्ज भरता येणार, वाचा अधिक
– अपेक्षित हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी केला छळ, त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्म’हत्या, मावळमधील धक्कादायक प्रकार!