व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंगळवार ठरला अपघातवार, अवघ्या सव्वा तासात द्रुतगती मार्गावर तीन वेगवेगळे अपघात । Mumbai Pune Expressway

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स सेवा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून अपघातात मदतकार्य करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 9, 2024
in महाराष्ट्र
Three accidents in one hour on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि.8) सकाळच्या सुमारास तीन वेगवेगळे अपघात घडले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये सुदैवाने कोणीही दगावले नसले तरीही अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सर्व अपघात घडले आहेत.

सकाळच्या सुमारास एका मागोमाग एक झालेल्या या अपघातांमध्ये आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स सेवा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून अपघातात मदतकार्य करण्यात आले. यंत्रणांनी तातडीने मदत कार्य करून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. खोपोली स्टेशनच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. त्यामुळे खोपोली पोलीस स्टेशनच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन अपघातांची नोंद केली आहे.

अपघात क्रमांक – 1
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर (किमी 38.500) मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ट्रक (क्र. HR 55 AF 2439) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक अतिवेगाने चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरील कंटेनरला (क्र. MH 04 LY 8812) पाठीमागून धडक दिली. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी होऊन ट्रकच्या केबिनमध्ये अडला होता. देवदूत टीमच्या मदतीने त्याला केबिन बाहेर काढून उपचाराकरीता एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले.

अपघात क्रमांक – 2
पहिला अपघात झाल्याच्या अर्ध्या तासानंतर द्रुतगती मार्गावर सकाळी पाऊणे नऊ वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर (किमी 39.500) आणखीन एक अपघात घडला. कंटेनर (क्र. MH 43 Y 1154) वरील चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनास (क्र. MH 12 MY 3234) पाठीमागून ठोकर दिली. या अपघातामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला.

अपघात क्रमांक – 3
वरील दोन्ही अपघातातील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करीत असतानाच साडेनऊच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर (किमी 39.700) येथे कंटेनरचा (क्र. HP 39 UG 1132) ब्रेक फेल झाल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून अपघात घडला. कंटेनरने समोरील कारला (क्र. KA 22 AA 3577) धडक दिली. यामुळे कारची त्यापुढील पिकअप (क्र HR 55 AS 7223) वाहनाला ठोकर लागून अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– नायगावमधील ‘त्या’ जोडप्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत कार चालक युवकाला तळेगावमधून अटक । Kamshet News
– सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News
– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Previous Post

आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा । Talegaon Dabhade

Next Post

अवैध दारूअड्ड्यांवरील छाप्यात सव्वासतरा लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra-State-Excise-Department

अवैध दारूअड्ड्यांवरील छाप्यात सव्वासतरा लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.