हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे आणि कोन इलिवेटोर (KONE Elevator) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत खेड आणि मावळ तालुक्यातील विभागात महिला सक्षमीकरणावर काम करण्यात येत आहे. त्यानुसार खेड तालुक्यातील शिवे या गावात तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण व सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे. त्याअंतर्गत शिवे (ता.खेड, जि. पुणे) या ठिकाणी दिनांक 27 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत महिलांना मसाला बनविणे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा मध्ये एकूण 10 महिलांनी सहभाग घेतला. ( Three day spice making training camp for economic upliftment of women in Shive village Khed )
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून शीतल वरपे यांनी काम केले. तसेच हॅन्ड इन हॅन्ड कडून ओंकार कुलकर्णी, मनीषा गायके, शरद वाडीले आणि शिवे गावातील बचत गटातील सदस्य उपस्थित होते. यावेळी ओंकार कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत शिवे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन । National Science Day
– वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात; आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध
– दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आमदार शेळकेंकडून मोफत वाहतूक सेवा, सलग 7 वर्षांपासून सुरु आहे उपक्रम