पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुसगाव ( kusgaon ) येथून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुली उस्मानाबाद ( Osmanabad ) येथे पनवेल-नांदेड ट्रेनमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. पुणे ग्रामीणच्या पोलिस ( Pune Gramin Police ) अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
वय 13 आणि 12 वर्षांच्या या दोन अल्पवयीन मुली शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. दुपारी अडीच वाजता पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता मुली शाळेतून निघून गेल्या असल्याचे समजले. मुलींच्या पालकांनी त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र, मुली गायब असल्याचे समजले.
त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलींचे वडील सुभाष जाधव यांनी त्याच दिवशी रात्री नऊ वाजता लोणावळा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली. शनिवारी संध्याकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात दोन मुली दिसल्या, अशी माहिती पोलिसांच्या माहितीने दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथक पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही मुली दिसल्या. दोन्ही मुली पनवेल-नांदेड ट्रेनमध्ये चढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले. हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक नांदेडकडे तैनात करण्यात आले होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी पनवेल-नांदेड रेल्वे मार्गावरील पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला.
उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर गाडी थांबली असता, तेथील पोलिसांनी बेपत्ता मुलींना शोधून काढले आणि नंतर रविवारी पहाटे 12.55 च्या सुमारास त्यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या चार तासांत मुलींना शोधून काढण्याची किमया केली. अल्पवयीन मुलांना पुन्हा कुटुंबाकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वडीलांच्या मद्यपान आणि मारहाणीला कंटाळून या मुलींनी घर सोडले होते. क्षुल्लक कारणावरून वडील त्यांना मारहाण करायचे आणि त्यामुळे मुली कर्नाटकातील गुलबर्गा येथे त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी जात होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ( Tired By Fathers Troubles Sisters Left House from Kusgaon Lonavla Found at Osmanabad )
अधिक वाचा –
बाबो..! मुलीच्या कानात गेला साप, काढताना डॉक्टरला फुटला घाम; बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी