देशभर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी आज अर्थात गुरुवार, 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी आज शेवटच्या दिवशी अनेकांचे अर्ज दाखल केले जाऊ शकतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे बुधवारी (दिनांक 24 एप्रिल) रोजी एकूण 8 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच बुधवारपर्यंत एकूण 18 उमेदवारांनी मावळ लोकसभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. ( Today 25th April last day to file nominations for Maval Lok Sabha So far 18 candidates filed nominations )
बुधवारी दाखल झालेल्या उमेदलारी अर्जाच वंचितच्या माधवी जोशी, भिमसेना पक्षाकडून संतोष उबाळे, धर्मराज पक्षाकडून महेशसिंग ठाकूर, मधुकर थोरात, सुहास राणे, राहुल मदने, तुषार लोंढे, शिवाजी जाधव यांचा समावेश आहे. तसेच बुधवारी संजोग वाघेरे यांच्याकडून पुन्हा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आला आहे.
तसेच, बुधवारी (दि. 24) एकूण 5 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. आकुर्डी येथील पीएमआरडीए च्या कार्यालयातून मावळ लोकसभेचे हे कामकाज सूरु आहे. बुधवारी 5 व्यक्तींनी एकूण 12 अर्ज नेले. तसेच गेल्या 7 दिवसांत 74 जणांनी 146 अर्ज नेले आहेत. त्यामुळे आज (दि. 2) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जास्त उमेदवारी अर्ज येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अधिक वाचा –
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property
– संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property
– ‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha