Dainik Maval News : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.15) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर केली. त्यानंतर मावळ मुळशी विभागाचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी यांनी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेत मावळ विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली.
मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 94 हजार 833 पुरुष आणि 1 लाख 85 हजार 451 स्त्रिया तसेच 13 तृतीयपंथीय असे एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार असून एकूण 402 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राथमिक सुविधा उपलब्ध करणार असल्याचे यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मावळ विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम –
वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन फॉर्म सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत स्विकारण्यात येतील. दिनांक 30 तारखेला या अर्जांची छाननी करण्यात येईल. दिवाळी सण झाल्यानंतर 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर तळेगाव येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सर्व मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न । Maval News
– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी
– टाकवे गावात होणार भव्य मारुती मंदिर, दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke