Dainik Maval News : पवन मावळ विभागातील आजिवली गावात शिवसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कै. भाऊ लायगुडे, चेअरमन कै. अंकुश लायगुडे व मा. उपसरपंच कै. संतोष भाऊ भिकोले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आणुि मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये 15 महिला आणि 65 पुरुष अशा एकूण 80 दात्यांनी रक्तदान केले. यासह महिला व पुरुष अशा एकूण 231 जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
भारतीय जनता माथाडी जनरल संघ, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल लायगुडे, हमराज मित्र मंडळ अध्यक्ष शशांक बोडके, आजिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच, आशा भिकोले, उपसरपंच छाया गोणते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
पी.एस.आय. ब्लड बँक पिंपरी-चिंचवड यांच्या तर्फे रक्त संकलनांचे काम करण्यात आले. दत्त मंदिर, अजिवली येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री वाघजाई देवी ट्रस्ट, सुदर्शन मित्र मंजळ, नवयुग मित्र मंजळ, निळ वादळ ग्रुप, दत्तराज वाचनालय आणि समस्थ ग्रामस्थ अजिवली यांनी याचे व्यवस्थापन केले होते.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल लायगुडे, मा. सरपंच सचिन शिंदे, मा. उपसरपंच रुपाली लायगुडे, पो. पा. रुपालीताई लायगुडे, आंनता लायगुडे, सुनिल ओव्हाळ, भगवान भिकोले, धोंडूभाऊ जाधव, तानाजी लायगुडे, नारायण केंडे, संतोष केंडे, तेजस भिकोले, रवीभाऊ लायगुडे, सोनाबाई केंडे, बबन लायगुडे, शिवसम्राट प्रतिष्ठानचे महेश लायगुडे, किसन लायगुडे, संभाजी लायगुडे, देविदास लायगुडे, शत्रुघ्न लायगुडे, भरत लायगुडे, शेखर लायगुडे, निखिल लायगुडे, रवींद्र उंबरकर, संभाजी केंडे, शंकर जाधव, संतोष लायगुडे, गणपत लायगुडे, रोहिदास लायगुडे, देविदास लायगुडे, सुखदेव केदारी, प्रदीप लायगुडे, विश्वनाथ केंडे, रामदास राऊत, अमोल राऊत, गुलाब केंडे, विशाल ओव्हाळ, मनोज शिंदे, अक्षय केंडे, नितीन केदारी, उत्तम लायगुडे, तातेराम उंबरकर, उत्तम लायगुडे, रामदास लायगुडे, रोहित लायगुडे, साहिल केंडे, बाळू केंडे, विकास केंडे, दीपक केंडे, सुनील थोरवे, भरत केंडे, दत्ता केंडे, शिवाजी लायगुडे, चंद्रकांत जाधव, अविनाश दुर्गे, संतोष लायगुडे, पुरण लायगुडे, रोहिदास लायगुडे, मॉन्टी ओव्हाळ, हर्षद लायगुडे, प्रथमेश लायगुडे, उमेश लायगुडे, विजय लायगुडे उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब