Dainik Maval News : पुणे – मुंबई या महानगरांच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला पर्यटनाचा तालुका असलेला मावळ तालुका आणि येथील सर्वच पर्यटनस्थळे आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संपूर्ण देशभरातून पर्यटकांचा ओघ मावळकडे सुरू झाला असून तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असलेल्या ठिकाणचे टेन्ट हाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, व्हिला, फार्महाऊस आदी ठिकाणी बुकींग जवळपास फुल्ल होत आल्या आहेत.
नाताळ अर्था ख्रिसमस सणाच्या सुटीपासून सुरू झालेल्या सुट्ट्या आणि वीकेंड यामुळे मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. तर, वर्षाअखेर अर्थात थर्टी फर्स्ट आणि नूतन वर्षाचे स्वागत यामुळे दिनांक ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोणावळा खंडाळा सहीत पवनमावळातील पवना डॅम, किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, कोराईगड, जवळपास असणारे ताजे – भाजे लेणी, बेडसे लेणी, कार्ला लेणी, राजमाची किल्ला, लोणावळ्याजवळील फेमस लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, खंडाळा येथील ‘सनसेट पॉइंट’ तसेच तालुक्यातील अन्य ठिकाणी पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देणे किंवा नूतन वर्षाचे स्वागत करणे पसंत करताता, यामुळे यापरिसरातील निवास व्यवस्था असलेले ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे.
नववर्ष स्वागत, सुट्ट्या व सप्ताहअखेरमुळे पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने ३०-३१ डिसेंबर ते एक जानेवारी २०२६ या कालावधीत पुणे, मुंबई, कामशेतकडून येणाऱ्या वाहनांना पवनानगर बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात आली आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग – येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) – कोथुर्णे गाव येथून डावीकडे कोथुर्णे / मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राह्मणोलीकडे वारू फाट्यावरून पुढे सरळ – ब्राह्मणोली फाटामार्गे जवण रस्ता मार्गे गणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग या मार्गाने जावे -पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, धामनधरा, दुधिवरेकडे जाणारी वाहने तसेच जड / अवजड वाहनांना सोडण्यात येणार
खासगी बंगले, रिसोर्ट, हॉटेल, टेंट, कॅम्पिंग चालक मालकांनी नियमानुसार आवश्यक परवानग्या घेऊन व्यवसाय करावा. नववर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, अशी सूचना लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
