व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला मिसिंग लिंक तयार होत असून या मिसिंग लिंकमुळे सदर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Mumbai Pune missing link project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला मिसिंग लिंक तयार होत असून या मिसिंग लिंकमुळे सदर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ( missing link mumbai pune )

मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र रस्ते मार्गाने दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा असेल तर सध्या मुंबई पुणे-एक्सप्रेस वे हा चांगला पर्याय प्रवाशांपुढे उभा आहे.

त्यामुळे या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात आणि यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. काही प्रसंगी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अर्धा अधिकवेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते.

  • पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा या विभागातील जनता याच मार्गाने राजधानी मुंबई दाखल होत असते, त्यामुळेही या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक असते. परंतु आता मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे ह्या महामार्गावरील प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा सहा पदरी महामार्ग आहे. महाराष्ट्रातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असून याची लांबी 95 किलोमीटर इतकी आहे. द्रुतगती मार्गावर लोणावळा-खंडाळा घाटात दिवसा व रात्री सुद्धा वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिसिंग लिंक तयार केला गेला आहे.

  • लोणावळा खंडाळा या घाट सेक्शन मधून वाहनांना मोठा वळसा घालावा लागतो. एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंतचे अंतर हे जवळपास 19 किलोमीटरचे आहे. मात्र आता हे अंतर 6 किमी ने कमी होणार आहे.

कारण मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत खंडाळा जवळील हा संपूर्ण घाट आणि चढ उतार टाळून थेट बाजूने दुसरा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये दोन मोठे बोगदे आणि पूल यांचा समावेश आहे. दरम्यान या मिसिंग लिंकच्या बांधकामानंतर हे 19 किमीचे अंतर 13 किमी होईल.

रस्त्याचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे आणि प्रवाशांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे. या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 92 टक्के इतके काम झाले असून हा प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News


Previous Post

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान

Next Post

‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

'पुणे रिंगरोड'च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.