तुम्ही जर आज (रविवार, 12 फेब्रुवारी) रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते दुपारी 3 कालावधीत या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या कालावधीत ही वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून पुन्हा द्रुतगतीमार्गावरुन पुण्याकडे वळवण्यात येणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Traffic Diversion On Pune-Mumbai Expressway On February 12 Due To MSRDC Launching An Overhead Gantry Work At Kalamboli Entrance )
तसेच, या कालावधी दरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी 9822498223 या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा इथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत
– भंडारा डोंगर पायथ्याजवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
– खंडाळा बोगद्यासमोर डस्टर कारला अचानक आग – पाहा व्हिडिओ