Dainik Maval News : मळवली, भाजे, सदापूर, देवले, पाटण, बोरज परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मळवली येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलावरून दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांना वाहतूकीची परवानगी देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्हाधिकारी यांनी २८ ऑगस्टपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. परिसरातील नागरिक प्रशासनाच्या या निर्णयाने हैराण झाल्याने विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर 30 ऑगस्टपासून स्थानिकांना त्रास होऊ नये यासाठी फक्त दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत पुलाच्या कठड्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ( traffic of small vehicles has started from bridge over Malvali Indrayani river )
कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू होते. आमदार सुनील शेळके यांंच्या प्रयत्नांतून गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून इंद्रायणीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरु होते. दरम्यान या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र बांधकाम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागला.
अधिक वाचा –
– तालुक्याच्या राजधानीत विजेचा लपंडाव; नागरिक, व्यावसायिक सर्वांनाच नाहक त्रास । Vadgaon Maval
– छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval
– ‘केवळ आठ महिन्यात पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन । Maval News