व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोमाटणे, तळेगाव दाभाडे हद्दीत ‘पीएमआरडीए’ची कारवाई ; हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून सोमाटणे व तळेगाव दाभाडे येथील अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंट यासह अनधिकृत होर्डींगवर गुरुवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 1, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Action of PMRDA

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून सोमाटणे व तळेगाव दाभाडे येथील अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंट यासह अनधिकृत होर्डींगवर गुरुवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएच्या हद्दीतील सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई यापुढे पण चालू राहील, असे उपजिल्हाधिकरी डॉ. दीप्ती सूर्यवंशी स्पष्ट यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर कारवाईत हॉटेल काव्या बार अँड रेस्टो या हॉटेलचे परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम पीएमआरडीएने काढत यापुढे अनधिकृत बांधकाम करणार नसल्याचे जबाबद्वारे नोंदवण्यात आले. हॉटेल आदित्य बार हॉटेलवर कारवाईसाठी गेले असता स्थानिक प्रतिनिधी यांनी पीएमआरडीएने संबंध‍ित व्यावसायिकांना हॉटेल अधिकृत करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली. ( Action of PMRDA in Somatne Talegaon Dabhade area )

हॉटेल व्यावसायिक स्वतः अनधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या अथवा परवानगी घेण्याच्या जबाबावर तेथील कारवाई पुढे ढकलण्यात आली. परंतु जबाबमधील मुदत न पाळल्यास त्यावर कारवाई अटळ असल्याचे बांधकामधारकास स्पष्ट करण्यात आले आहे. यासह हॉटेल मयूर गार्डन अँड बार व भजनसिंग ढाब्याचे परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकामाचे निष्कासन करण्यात आले. यात तीन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई प्रस्तावित होती. यादरम्यान २ होर्डिंगधारकांनी स्वतःचे होर्डींग काढून घेतले तर उर्वरीत एका अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएकडून निष्कासनाची करत ते जप्त करण्यात आले.

गुरुवारच्या कारवाईत साधारणपणे ५८४०.०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल, पब, रेस्टॉरंट व बार हे पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यादरम्यान पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील उपस्थित अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले. संबंध‍ित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार राजेंद्र रांजणे, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, अभिनव लोढे तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी संपावर ; सामान्यांची कामे रखडणार । Maval News
– तालुक्याच्या राजधानीत विजेचा लपंडाव; नागरिक, व्यावसायिक सर्वांनाच नाहक त्रास । Vadgaon Maval
– छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News

Next Post

पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Good Touch Bad Touch

पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना 'गुड टच - बड टॅच'चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.