शासनाच्या विविध योजना यांसह पिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मदत मिळवण्यासाठी ई – पीक पाहणी ( E-Peek Pahani ) केल्याची नोंद असणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी व्हर्जन दोन ( E Peek Pahani App ) हे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
मात्र, मुळशी तालुक्यात ( Mulshi Taluka ) शेतकऱ्यांकडून ही नोंदणी करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून स्वतः तहसीलदार अभय चव्हाण ( Tahsildar Abhay Chavan ) यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत नव्या मोहिमेला सुरुवात केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुळशी तालुक्यामध्ये शेतकरी खातेदारांनी ईपीक पाहणीमध्ये निरुत्साह दाखवल्यामुळे, पिक पाहणी करिता ई – पीक पाहणी ( E-PEEK APPLICATION ) वापरणेबाबत जनजागृती करणे आणि या ॲप्लिकेशनच्या ( Application) माध्यमातून शेतकऱ्यांद्वारे शेतकऱ्याच्या शेतामध्ये ई-पीक पाहणी करण्यासाठी रविवारपासून (11 सप्टेंबर) तहसीलदार कार्यालयामार्फत विशेष मोहीम सुरू करण्यात आली.
ई-पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांनी चालू पीक पेरा नोंदवला नाही तर, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यास सरकारी पंचनामा करता येणार नाही. तसेच नुकसान भरपाई मिळणार नाही, याची सुचना यावेळी शेतऱ्यांना देण्यात आली. ( Training of E-Peek Pahani App To Farmers By Administration Mulshi Taluka )
अधिक वाचा –
ई-पीक पाहणी नोंदवण्याची अंतिम तारीख जवळ; मावळात शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नोंदणीचे प्रशिक्षण
चिमुकल्या आदित्यचा खून, संपूर्ण प्रकरण मन सुन्न करणारं, पैसा इतका मोलाचा असतो?