लोणावळा येथील शिवसेवा प्रतिष्ठान मार्फत रविवारी (दि. 23 जून) पवन मावळ भागातील येळसे गावात वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक अभियान राबवण्यात आले. शिवसेवा प्रतिष्ठानचे मुंबई, पुणे शहरातील तसेच मावळ तालुक्यातील अनेक सदस्य, वृक्षप्रेमी आवर्जून या अभियानात सहभागी झाले होते. तसेच येळसे गावातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ सोबत शाळेतील शिक्षकवृंद देखील मोहिमेत सभागी झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वृक्षारोपण करण्यासाठी विविध देशी झाडांची निवड करण्यात आली होती. यात प्रामुख्याने आंबा, जांभूळ, फणस, जाम, कडुलिंब, बेल, चिंच, वड, पिंपळ आदी झाडांची रोपे निवडण्यात आली होती. वृक्षारोपण झाल्यानंतर ग्रामस्थांनी अत्यंत काळजीने झाडांचे संवर्धन करू, अशी ग्वाही दिली. यावेळी लोणावळ्यातील उद्योजक राजीव देशपांडे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा येळसेचे कंपाउंडचे काम पूर्ण करण्यात आले, त्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले. ( Tree plantation campaign in Yelse village through Shivseva Pratishthan Lonavala )
वृक्षारोपणानंतर शिवसेना प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांसाठी ग्रामस्थांनी चहापान आणि अल्पोपहाराचे नियोजन केले होते. वृक्षारोपण मोहिमेत ॲड. ऋतुजा आंबेकर, मिलिंद भणगे, ॲड. संजय वांद्रे, दत्तात्रय येवले, मनोज लऊळकर, शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, प्रमोद देशपांडे, राजेश कामठे, राजेश येवले, भगवान गायकवाड आणि शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद सहभागी झाले होते. नवनाथ ठाकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
अधिक वाचा –
– BREAKING ! मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू
– शिळींबमधील ‘अंजनवेल’ येथे ‘द्रौपतीमाला पुष्प’ फुलांना बहर ! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 22 कोटींची विकासकामे…