Dainik Maval News : किशोरभाऊंनी सामाजिक कार्यातून उभा केलेला आदर्श आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उद्योजक रामदास काकडे यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. येथील मराठा क्रांती चौकात समाजसेवक किशोर आवारे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित अभिवादन सभेत काकडे बोलत होते.
पुढे बोलताना काकडे यांनी, कोरोना काळातील समाजसेवा, जनसेवा थाळी, लसीकरण उपक्रम, पुसाणे गावासाठी सौरऊर्जेवर आधारित उपाययोजना, तळेगाव स्टेशन परिसरातील गो.नी. दांडेकर उद्यान उभारणी ही किशोरभाऊंची कार्ये होती, असे सांगत स्व. किशोर आवारे यांच्या समाजकार्याला उजाळा दिला. यावेळी इतरही मान्यवरांनी किशोरभाऊंविषयी आठवणी सांगत श्रद्धांजली अर्पण केली.
- कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगरसेवक निखिल भगत, समीर खांडगे, रोहित लांघे, सुनील कारंडे, संतोष शिंदे, सचिन टकले, अंकुश ढोरे, कल्पेश भगत, चिराग खांडगे, निलेश पारगे, इंद्रजीत आवारे, ॲड. अभिजीत आवारे, विशाल लोखंडे, महेश निंबाळकर, दिलीप डोळस, मिलिंद अच्युत, गोरख काकडे आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कै. किशोर आवारे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बाणेर येथील आय.आय.एम.एस. आणि डॉ. तोडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच जनसेवा मित्र मंडळ यांच्या वतीने जोशीवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश