मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. द्रुतगती मार्गावर किलोमीटर 45.500 च्या दरम्यान मुंबई लेनवर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक उलटला. सुदैवाने आयआरबी पेट्रोलिंग आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने चालकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. ( Truck Accident On Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर ट्रक चालक जखमी असून त्याला उपचारार्थ लोकमान्य हॉस्पिटल अँब्युलन्समधून शिफ्ट करण्यात आले. तसेच ट्रक डाव्या बाजूच्या लेन पलटल्याने वाहतूक तातडीने सुरळीत करण्यात वाहतूक पोलिस यंत्रणेला यश आले.
नामदेव प्रसन्न ( वय 32 वर्षे, राहणार बिदर – कर्नाटक) असे जखमी वाहन चालकाचे नाव असून त्यास उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटल, निगडी येथे दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मावळात भाजपचा पहिला सरपंच ! Maval Politics
मावळकरांची उपचारासाठीची धावाधाव कमी होणार; कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु