मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या दोन चिक्की विक्री दुकानात ट्रक शिरल्याची घटना शनिवारी (दि. 21 ऑक्टोबर) घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. परंतू ट्रकच्या धडकेत दाेन वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रकचालक सहदेव नाथा सूर्यवंशी (वय 48, सध्या रा. नवी मुंबई, मूळ रा. माजलगाव, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ट्रकचालक सूर्यवंशी सकाळी साडेअकराच्या सुमारास खंडाळ्याकडे निघाला होता. पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटला. ट्रक चिक्की विक्री करणाऱ्या दुकानात शिरला. प्रसंगावधान राखून ट्रकचालकाने ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.
दुकानात शिरलेला ट्रक मागे घेण्यात येत होता. त्यावेळी ट्रकने एक मोटार आणि दुचाकीला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालक सूर्यवंशीला ताब्यात घेतले.
अधिक वाचा –
– मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
– उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
– यंदा गुलाल उधळायचाच..! ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 117 अर्ज, वाचा गावनिहाय आकडेवारी