Dainik Maval News : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये एकजण जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली. मोहमद कायस मोहमद जुबेर (वय 36, रा. कुर्ला, मुंबई) असे जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
धनाजी संभाजी काटकर (वय 50, रा. पुसे गाव, ता. खटाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. पोलीस अंमलदार विक्रम उत्तमराव वाकळे (वय 25) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर यांनी आपला ट्रक द्रुतगती मार्गावर सिंबॉसिस कॉलेजसमोर उभा केला होता. ते खाली उतरून ट्रकच्या समोर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या काटकर यांच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचालक जुबेर हे गंभीर जखमी झाले. तसेच दोन्ही ट्रकचेही मोठे नुकसान झाले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड