Dainik Maval News : राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी मावळातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदान करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्यावेत, असे आवाहन तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष हरीभाऊ दाभाडे पाटील यांनी केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा या पक्षांनी अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिल्यामुळे बापूसाहेब भेगडे यांच्या नावावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यू-टर्न घेतला असून सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून आता भाजपचे पक्षनिष्ठ नेते व कार्यकर्ते उघडपणे आमदार शेळके यांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत.
- तळेगावमध्ये आमच्या दाभाडे परिवारातील 99 टक्के घरे ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर आहेत. दोन-तीन घरे मात्र पहिल्यापासून जनसंघ, भाजपशी एकनिष्ठ आहेत. मी भारतीय जनता पक्षाचा तळेगाव शहराध्यक्ष आहे. सर्वांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचे काम करायचे आहे, हा पक्षाचा आदेश आहे. मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती, असे संतोष दाभाडे यांनी सांगितले.
सुनील शेळके यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत. आमदार शेळके यांनी मुलांचे शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, मोफत वैद्यकीय उपचार, हॉस्पिटलच्या बिलांमध्ये सूट, नोकरी, व्यवसायासाठी मदत अशी लोकांची कितीतरी वैयक्तिक कामे करून मदत केली आहे, याची संतोष दाभाडे यांनी उपस्थितांना आठवण करून दिली.
‘वरून पिपाणी, आतून तुतारी’
बापूसाहेब भेगडे यांची प्रतिमा ‘सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार’ म्हणून उभी करण्यात येत असून त्यांना पिपाणी हे चिन्ह मिळाले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा यांनी अधिकृत पाठिंबा दिल्यामुळे ते महाविकास आघाडीचेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरून पिपाणी आणि आतून तुतारी, अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते कधीही तुतारीचा प्रचार करणार नाहीत, असे संतोष दाभाडे म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वातावरण तापलं ! मावळात शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात
– कार्ला, कुसगाव, ओळकाईवाडी येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन । Lonavala Police
– दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती