Tukaram Beej 2024 : श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम बीज यंदा बुधवारी, दिनांक 27 मार्च रोजी साजरी होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे हे 375 वे वर्ष अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त देहूगावात मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून अनेक मानाच्या दिंड्या देहूगावात दाखल होत आहेत. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातूनही पायी दिंडी आणि पालखी देहूच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
दरवर्षी बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक मोठ्या संख्येने देहू येथे येत असतात. यंदा तर अमृतमहोत्सवी वर्षामुळे 27 मार्चला देहूत लाखो वारकरी भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. देहूमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये दिंडी आणि पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. गावोगावच्या दिंड्या तसेच काही मानाच्या दिंड्या देहूमध्ये बीज सोहळ्यासाठी येत असतात. आज, सोमवारी (दि. 25) पवनानगर येथील श्री ओंकार मंदिर येथून मावळ तालुका वारकरी मंडळ च्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पायी दिंडी पवन मावळ ही देहूच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी वाटेत गावोगावी वारकरी भाविक पालखीच्या स्वागताला उभे होते. ( Tukaram Beej 2024 Pavan Maval Dindi and Palkhi Left Towards Dehu Village From Pavananagar )
अधिक वाचा –
– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीसोबत, लोकसभेची एक जागा मिळणार । Lok Sabha Election 2024
– ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024
– मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval