Dainik Maval News : पवन मावळ विभागातील महागाव येथे एका गोठ्याजवळ आढळलेल्या बारा फुटी अजगर जातीच्या सापाला सर्पमित्र रमेश कुंभार यांच्यामुळे जीवदान मिळाले आहे. शनिवारी (दि.५) सायंकाळी महागाव येथील आदिनाथ पडवळ यांना घराजवळील गोठ्यात अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ गावातील आपदा मित्र तथा सर्पमित्र रमेश कुंभार यांच्याशी संपर्क केला.
रमेश कुंभार यांनी पडवळ यांच्या गोठ्याच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तिथे भलामोठा अजगर साप असल्याचे दिसून आले. उन्हाच्या काहिलीत गारव्यासाठी साप तिथे आला असावा. सर्पमित्र रमेश कुंभार यांनी सुरक्षितरित्या त्या अजगर सापाला पकडले व त्याची तपासणी केली. त्यावेळी सापाचा एक डोळा निकामी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तत्काळ याबाबत वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक निलेश गराडे यांना कळविले. उशीर झाला असल्याने अजगराला सुरक्षितरित्या आपल्याच घरातील एका खोलीत ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपदा मित्र निलेश गराडे, अनिल आंद्रे यांनी अजगरास ताब्यात घेतले व पुढील उपचारासाठी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे पाठविले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates