Dainik Maval News : रूमचा पत्रा वाजविल्याच्या कारणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवकाला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर सदर युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.2) प्राप्त फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आता पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद मोहित यादव (रा. विठ्ठलवाडी, तळवडे हॉस्पीटलजवळ, पुणे) यांनी शनिवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात फिर्यादीचा भाऊ अमोदकुमार मोहित यादव याला जुण्या भांडणाचा राग मनात धरून जयप्रकाश सदय व भोगींदर सदय (दोघे रा. विठ्ठलवाडी, तळवडे हॉस्पीटलजवळ, पुणे) यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात व पाठीत मारहाण करून गंभीर जखमी केले होते, त्यानंतर भाऊ अमोदकुमार मोहित यादव याचा औषधोपचार दरम्यान मृत्यू झाला असल्याची फिर्याद देहूरोड पोलीस ठाण्यात प्रमोद यादवने दिली होती.
सदर खुनाचा गंभीर गुन्हा दाखल होताच वरीष्ठांच्या आदेशाने देहूरोड पोलीस ठाणे येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरु केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी भोगेंद्रकुमार जोखन सदाय (वय २३ वर्षे, रा. सनसवाडी, शिक्रापुर पुणे, मुळ रा. मधुबनी जिल्हा, बिहार) यास शिक्रापूर येथून सर्वात आधी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचा साथीदार जयप्रकाश रामकिसन सदाय (वय १९ वर्षे, रा. हांडेवाडी, कात्रज, पुणे मुळ मधुबनी जिल्हा, बिहार) यास मुळ गावी मधुबणी (बिहार) येथे पळून जात असताना भुसावळ रेल्वे जंक्शन येथून शिताफीने ताब्यात घेतण्यात आले.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार किरण खेडकर, बाळासाहेब विघाते, प्रविण माने, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, खंडु विरणक, मंगेश लोखंडे यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे टोलनाक्यावर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी सुरु । Maval News
– त्यांच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मावळात भाजपा पक्ष संपत चाललाय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke
– मावळ विधानसभेत बापूसाहेब भेगडे यांचा झंझावाती प्रचार ; विरोधी उमेदवारावर आरोपांच्या फैरी । Bapu Bhegade