Dainik Maval News : तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देऊन ती तार सराफ व्यावसायिकाकडे ठेऊन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांना लोणावळा येथून अटक केली. गणेश शिवाजी भिंगारे (वय 36, रा. फणसडोंगरी पेण, ता. पेण, जि. रायगड), राकेश भवानजी पासड (वय 42, रा. अंबरनाथ वेस्ट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत गणेश दाभाडे हे सराफ व्यापारी आहेत. त्यांचे मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी येथे हरी ओम ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी (दि.3) दोघेजण दाभाडे यांच्या दुकानात आले. त्यांनी दाभाडे यांना बनावट सोन्याची चेन खरी असल्याचे भासवून दाभाडे यांना दिली. त्याबाबत आरोपींनी पावती देखील दाखवली. बाजारभावापेक्षा कमी किंमत देण्याची आरोपींनी मागणी केली.
- आपला फायदा होत असल्याने दाभाडे यांनी ती चेन घेऊन आरोपींना 70 हजार रुपये दिले. त्यानंतर दाभाडे यांनी चेन घासून बघितली असता ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला. आरोपींना लोणावळा येथून अटक करण्यात आली.
दाभाडे यांची फसवणूक करून मिळालेले 70 हजार रुपये आरोपींनी आपसात वाटून घेतले होते. त्यांच्याकडून ७० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपी तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देत आणि ते खरे सोने असल्याचे भासवून ते सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवत असत. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पोलीस अंमलदार अनंत रावण, ज्ञानेश्वर सातकर, भीमराव खिलारे, विनायक शेरमाळे, स्वराज साठे, रमेश घुले यांच्या पथकाने केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन