Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पुसाणे येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 6) गावाजळील डोंगरावर चरायला गेलेल्या सात आठ म्हशी सायंकाळी पाच साडेपाचच्या सुमारास पुन्हा गावात माघारी गोठ्याकडे येत होत्या, तेव्हा त्यातील दोन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
घराकडे गोठ्यात परतताना दोन म्हशींचा पाय सौर प्लांटच्या ओपन असलेल्या वायरीवर पडला. त्यामुळे दोन म्हशींचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सदर म्हशी या सुदाम रामभाऊ वाजे (रा. पुसाणे ता. मावळ जि. पुणे) यांच्या असल्याचे समजते. दरम्यान म्हशींच्या अशा दुर्दैवी मरणाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. तर, मालक सुदाम रामभाऊ वाजे यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक आणि भावनिक संकट कोसळले आहे. ( Two buffaloes died due to lightning Incident at Pusane village Maval )
अधिक वाचा –
– रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच मावळच्या वतीने श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे फराळ वाटप । Maval News
– आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News
– चांदखेड येथे अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीचालक तरूणाचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर । Maval News