तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी आज रविवारची सकाळ अत्यंत धक्कादायक ठरली आहे. तळेगाव शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा आज (रविवार, दिनांक 19 मार्च) दुःखद निधन झाले आहे. ( Two Citizens Of Talegaon Dabhade City Died Due To Illness on Sunday 19th March )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव शहरातील राहुल दाभाडे यांचे वडील कै पांडुरंग गणपत दाभाडे यांचे आज (रविवार, 19 मार्च) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यापाठीमागे त्यांचा संपूर्ण परिवार आणि नातेवाईक असा गोतावळा आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी दहा वाजता पंचवटी कॉलनी राहत्या घरापासून निघेल. तळेगावातील बनेश्वर स्मशानभूमी इथे त्यांचा अंत्यविधी होईल.
कै पांडूरंग दाभाडे यांच्यासह तळेगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक कृष्णराव (मामा) कोंडीबा पेटकर यांचेही आजच (रविवार, 19 मार्च) सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचाही अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्म’हत्या, परिसरात खळबळ
– नागरी समस्या : ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर देण्याची मागणी, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलचे एजन्सीला निवेदन
– कामशेतमध्ये महावितरणचा अजब कारभार; ग्राहकाचे वीज बिल थकीत असतानाही त्याच जागी केले नवीन वीज जोडणी कनेक्शन