गुरुवारी, दिनांक 21/12/2023 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 वाजताच्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे हद्दीत km 10.750 व 29.200 या ठिकाणी 2 लेग सर्विसेबल Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील हलकी वाहने km 8.200 येथुन बोरले टोल नाका मार्गे NH 48 जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजुकडे वळवण्यात येतील. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्याकडून जाहीर आवाहन –
नाताळ सणानिमित्त शनिवार, दिनांक 23/12/2023, रविवार दिनांक 24/12/2023 आणि सोमवार दिनांक 25/12/2023 अशा सलग सुट्ट्या असल्याने तसेच शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. ( two hour traffic block on mumbai pune expressway for gantry installation weekend and christmas news )
मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने व कार हे सकाळी 06.00 ते दुपारी 12.00 या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते. तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी 12.00 वा. नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडी मुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळात ‘दादा’ गटाच्या अनेक नेत्यांचा ‘साहेब’ गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर
– राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
– मावळ तालुक्यातील 32 गावांत विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती