Dainik Maval News : ग्रामीण भागात शेतीची कामे संपली असून जत्रा यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक गावात सध्या बैलगाडा शर्यतीचा थरार दिसून येत आहे. मावळ तालुक्यात यामुळे पुन्हा एकदा भिर्रर्र आवाज घुमू लागला आहे. अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी बैलगाडा शौकिनांची मोठी गर्दी होत आहे.
नुकतीच मळवली गावात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय केदारी मित्रपरिवाराच्या वतीने छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावळी मळवलीतील छकडी बैलगाडा शर्यतीला परिसरातील बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली.
- या बैलगाडा शर्यतीत फायनल मध्ये आई ताजुबाई संघ व शरण्या बालगुडे जुगलबंदीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. बाबुराव वायकर, बंडा पडवळ व आशिष पडवळ जुगलबंदीने द्वितीय क्रमांक पटकाविला. शिवाजीराव टाकवे व वैष्णवी स्वामी गायकवाड यांना तृतीय क्रमांक मिळविला. तर चतुर्थ क्रमांक सचिन काजळे आणि पंचम क्रमांक बंडा पडवळ व आशिष पडवळ, सोमनाथ गोडंबे यांनी मिळवला.
बैलगाडीाशर्यतीला खासदार श्रीरग बारणे,दीपक हुलावळे, शरद हुलावळे, राजू खांडभोर, अंकुश देशमुख,बाळासाहेब भानुसघरे, मारुती देशमुख, सुरेश गायकवाड,सागर हुलावळे, राम सावंत, विशाल हुलावळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या छकडी बैलगाडा शर्यतीत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जवळपास दोनशे बैलगाडा मालक, शौकिन सहभागी झाले होते.
विजेत्या बैलगाडा मालकाला दुचाकी आणि रोख रक्कम असे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. यामुळे बैलगाडा मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने बैलगाडा शर्यतीचा उत्साह दुणावला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश